Monday, 15 December 2025

मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ

       मिराभाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ

·        आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा

                               - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

    मुंबई,दि.१५ : मिराभाईंदर शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ही काळाची गरज होती. या कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व गतिमान होईल.नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे वाहन नोंदणीवाहन परवानेनूतनीकरण तसेच इतर सर्व परिवहन विषयक सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असूनप्रशासकीय कामकाज अधिक सुलभपारदर्शक व गतिमान होईलअसा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

 

मंत्रालयातून दूर दृश्य प्रणालीद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मिराभाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मापरिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi