Thursday, 25 December 2025

हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश · नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क

 हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

·         नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क

 

मुंबईदि. २४ : नववर्षाचे आगमनउत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्सउपहारगृहे व  खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छसुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्सहॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावीअसे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

 

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापरअन्नपदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापरतसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाहीयाची काटेकोर तपासणी केली जाईल. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi