Sunday, 28 December 2025

सुधारित भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा · मुंबईकरांसाठी मोठी भेट · मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा · दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा

 सुधारित भोगवटा अभय योजनेची

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

·       मुंबईकरांसाठी मोठी भेट

·       मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

·       दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा

 

नागपूरदि. ११ : गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र ('ओसी') अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारित भोगवटा अभय योजनालागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. याचा फायदा वर्षानुवर्षे ओसीपासून वंचित दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल.

         विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती देतांना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले गेल्या साडेतीन वर्षांपासून राज्य शासन मुंबईचा कायापालट करत आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने परत आणण्यासाठी आणि येथे वास्तव्यास असलेल्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi