Friday, 19 December 2025

भगवान ऋषभदेवांनी पुरुषांसाठी ७२ कला आणि महिलांसाठी ६४ कलांचे विवेचन

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भगवान ऋषभदेवांनी पुरुषांसाठी ७२ कला आणि महिलांसाठी ६४ कलांचे विवेचन केले असून, वास्तुकला, धातुकाम, उत्पादन असे ते होते. वैविध्यपूर्ण जीवनपद्धतींचे त्या कलांचे पुनरुज्जीवन व संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून घडत आहे. देश, संस्कृती, अभिमान आणि स्वाभिमान यांसाठी हे कार्य अद्वितीय व अत्यंत मोलाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

याप्रसंगी जैन, बौद्ध, सनातन, शीख आदी विविध परंपरांचे वाहक एकत्र आले असून, सर्वांनी एकत्रितपणे भगवान ऋषभदेवांच्या विचारांना वंदन केले. सर्व संत, ऋषी, महंत, साध्वी आणि भिक्षू यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती ही भारतीय ज्ञान प्रणाली भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः जैन संतांनी ध्यान, साधना आणि लोककल्याणाच्या भावनेतून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले असून, ते मानवतेसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi