Saturday, 27 December 2025

अकोला जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्यात येईल

 अकोला जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील

गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्यात येईल

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

नागपूरदि. 10 : अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या सीएसआर निधींतर्गत बांधलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईलअसे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

          सदस्य अमोल मिटकरी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय खोडकेविक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

          याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्याटी पॉईंट ते बाळापूर या दरम्यान नॅशनल हायवे बांधला जात आहे. या रस्त्यावरून महानिर्मिती कंपनीमधील राखेची वाहतूक होते. या बांधकामाधीन रस्त्याचे २२ जुलै २०२५ रोजीच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून सध्या या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या कामाचा अंतिम चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजित १४.५० कोटींच्या खर्चापैकी आतापर्यंत ७.१५ कोटी एवढी रक्कम कंत्राटदारास अदा करण्यात आलेली आहे. या रस्त्याचा दर्जा चांगला असून या रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार झालेला नाही. तथापिसदस्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबत चौकशी करण्यात येईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi