Wednesday, 24 December 2025

‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ उपक्रम उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार व प्रोत्साहन

 स्वागत नववर्षाचंसंकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ उपक्रम

उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार व प्रोत्साहन

 

उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतीलतर राज्य स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

 

मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून स्वागत नववर्षाचंसंकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi