Monday, 8 December 2025

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार

 सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. 8 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाईवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वालपोलीस महासंचालक रश्मी शुक्लासामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमारमाजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल मनोहर ठोंगेविभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्रीजिल्हाधिकारी विपिन इटनकरमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi