सायबर गुन्हे, अमली पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीविरोधातही कारवाई तीव्र केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘महासायबर’च्या माध्यमातून सायबर फसवणूक, फेक कॉल सेंटर्स आणि डिजिटल अरेस्टसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात येत असून महासायबर हे देशातील सर्वात आधुनिक सायबर हेडक्वार्टर ठरले आहे. अनेक राज्यांनी आणि दोन देशांनी सहकार्यासाठी विनंती केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात असून, पेडलर्सवर मोका व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षांत ८८ हजारांहून अधिक पोलिस भरती झाल्याची माहिती देत, गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तराचा समारोप करताना, महाराष्ट्र आता थांबणार नाही, सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे, असे सांगितले.
00000
No comments:
Post a Comment