Sunday, 21 December 2025

भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण नियमांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ;

 भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण

नियमांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ;

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुनर्विकासास गती देण्यासाठी महत्त्वाचे बदल

 

 

नागपूरदि. १२ : भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरण करण्यासाठी लागू असलेल्या नियमांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असूनसुधारित नियम आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत आणि विधानसभेत या विषयावर निवेदन सादर केले.

            निवेदनामध्ये महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीमंत्रिमंडळाच्या ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रुपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असलेली मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यास मंजुरी मिळाली. हे रुपांतरण सवलतीच्या दराने करता येणार असून न्यायालयीन व प्राधिकरणीय कारणांमुळे विलंब झाल्यास सवलत मिळणार आहे.

            मंत्री बावनकुळे यांनी सांगितले कीन्यायालयीन प्रकरणेनियोजन प्राधिकरणाचे बदल किंवा भोगवटादाराच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे जमिनीचा विहित वापर पाच वर्षात करता न आल्यासशासन पुढील अटी पूर्ण झाल्यास पाच वर्षांच्या वापराची अट शिथील करू शकते— जमीन किमान दहा वर्षांपूर्वी प्रदान केलेली असावी. पाच वर्षांपर्यंत प्रयोजन बदल करता येणार नाही. प्रयोजन बदलावयाचा असल्यास शासनाची मान्यता व अधिमूल्य भरावे लागेल. नियोजन प्राधिकरणाचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi