Thursday, 18 December 2025

महाराष्ट्रात माता-बाल मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी; उपाययोजना अधिक प्रभावी करणार –

 महाराष्ट्रात माता-बाल मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी;

उपाययोजना अधिक प्रभावी करणार

–  सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

नागपूरदि. १४ : महाराष्ट्राचा माता मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले,केवळ घट झाली म्हणून समाधान मानणे योग्य नसूनमाता-बाल मृत्यू पूर्णपणे रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या एसओपीजननी सुरक्षा योजनाएनआरसी व एसएनसीयू योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१७-१९ या कालावधीत देशाचा माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे १०३ असताना महाराष्ट्राचा दर ३८ होता. तर २०२०-२२ मध्ये देशाचा दर ८८ आणि महाराष्ट्राचा ३६ असल्याची माहिती त्यांनी  यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi