महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यात येईल.या फाऊंडेशनला क्लिनिकल ट्रायल्स मधून निधीची उभारणी करता येईल, आशियाई विकास बैंक, जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी, जागतिक बैंक तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तसेच देणग्या, अनुदाने, सीएसआर अंतर्गत देखील निधी शासनाच्या मान्यतेने मिळवता येवू शकेल.आवश्यकता भासल्यास जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी, आशियाई विकास बँकेमार्फत राज्य शासनात्त प्राप्त होणा-या कर्जातून विहित प्रक्रियेद्वारे निधी उपलब्ध करून घेता येईल.
0000
No comments:
Post a Comment