Thursday, 4 December 2025

महाराष्ट्र 'राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

 महाराष्ट्र 'राजभवनझाले आता लोकभवन

 

मुंबई, दि. 2 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत.

 

राजभवन अधिक लोकाभिमुखपारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.   

 

लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राज भवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहताराज्यातील नागरिकसमाजातील विविध घटकविद्यार्थीसंशोधकशेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

 

'लोकभवनहे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवासहकार्य व संवादाचा सेतू व्हावेहीच या नामांतरामागची भूमिका आहेअसे त्यांनी सांगितले.

 

'लोकभवनकेवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहतासमाजाच्या आशाआकांक्षा आणि समस्यांप्रति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोकभवन असेल असे राज्यपालांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi