Saturday, 22 November 2025

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी उपयुक्त

 आर्थिक क्षेत्रातील हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोही

नागरिकांसाठी उपयुक्त

                                                          -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

·         मुंबई उपनगर जिल्ह्यात मोहिमेस उत्साहात सुरुवात

मुंबईदि.21 : आर्थिक क्षेत्रातील हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांनी येथे केले.

 

वित्तीय सेवा विभागअर्थ मंत्रालयनवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते वांद्रे (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात झालात्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे  मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पंछोली,  कॅनरा बँक मुख्य महाव्यवस्थापक रणजीव कुमार,  बँक ऑफ बडोदा महाव्यवस्थापक सुनीलकुमार शर्मायुको बँक महाव्यवस्थापक संदीप कुमारपंजाब नॅशनल बँक महाव्यवस्थापक उत्तम कुमार आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi