सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि
राष्ट्रीय रँकिंग उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ संदर्भात
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
मुंबई, दि. १७ : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक विद्यापींठात डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे आणि राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू उपस्थित होते.
No comments:
Post a Comment