मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उच्च शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यापीठ रँकिंगची सध्याची असलेली स्थिती याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय पातळीवर विद्यापींठाचे रँकिंग वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करुन कालबद्ध नियोजन करावे. या कृती आराखड्याला अधिक गती देण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड तयार करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
जागतिक स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्राशी करार, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम तयार करून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. खासगी विद्यापीठात नवनवीन कल्पना/ अभ्यासक्रम पुढे येत आहेत तसे सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment