Monday, 3 November 2025

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी

 वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा

-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले

 

मुंबईदि. 29 : कोल्हापूर व सातारा भागात लवकरच ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. कारखान्यांना ऊस नेण्यासाठी कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नयेयासाठी या महामार्गावरील भुयारी मार्गांची व सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

            कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी आमदार मनोज घोरपडेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजेराष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तवप्रकल्प संचालक संजय कदमउपसचिव सचिन  चिवटे आदी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपोलीस अधिक्षक हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi