आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संत श्री ज्ञानेश्वर चौक कांदिवली पूर्व येथे भक्ती संगीताचा भव्य कार्यक्रम पार पडला. कांदिवली पूर्वचे आमदार भातखळकर या भक्तिमय कार्यक्रमास उपस्थित होते.
'श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या तीन दिवसीय भव्य
सोहळ्यात विविध भव्य रांगोळ्यांच्या माध्यमातून संत दर्शन सोहळा, भजन स्पर्धा, सामूहिक पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि भक्तिमय संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. खरंच आपल्या सर्वांचे नक्कीच काही पुण्य असेल म्हणून आज आपण श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या भव्य कार्यक्रमात विविध पद्धतीने योगदान देऊ शकलो असे उदगार आमदार भातखळकर या प्रसंगी काढले. या सोहळ्यानिमित्त कीर्तनकार ह. भ. प. तुकाराम महाराज गावडे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
तसेच या सोहळ्याच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे सदारकर्ते गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या मधुर गायनाने कार्यक्रमाला अध्यात्मिक रंग चढला.
श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या तीन दिवसीय कार्यक्रमानिमित्त दिनांक : १५, १६ व १७ नोव्हेंबर २०२५ (कार्तिक वद्य त्रयोदशी) रोजी सावित्रीबाई फुले मैदान, फाऊंडेशन शाळेसमोर, लोखंडवाला संकुल, कांदिवली (पूर्व) येथे भव्य दिंडी सोहळा - भव्य भजन स्पर्धा - भक्ती संगीताचा कार्यक्रम व रांगोळीच्या माध्यमातून संत दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
.jpeg)
No comments:
Post a Comment