Tuesday, 18 November 2025

विकसित महाराष्ट्र 2047 पर्यत सार्वजनिक विद्यापीठाचे उद्दिष्टे, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची नॅशनल

 विकसित महाराष्ट्र 2047 पर्यत सार्वजनिक विद्यापीठाचे उद्दिष्टेराज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिटयूशनल रॅकिंग फेमवर्क (एआयआरएफ) रँकिंग सुधारणा,शैक्षणिक सुविधा संदर्भात विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीयांनी सादरीकरण केले.

बैठकीत खालील मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली :-

एनआयआरएफ मध्ये सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे

 महाराष्ट्राला जागतिक शिक्षणाचे गंतव्यस्थान बनवणेःराज्याबाहेर जाणारे विद्यार्थी रोखणे आणि एनआरआय व परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे

उच्च-टीआरएल (टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हलसंशोधन आणि व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान पेटंट्स निर्माण करणे

महाविद्यालयांमधील शिक्षणाची पातळी उंचावणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करणे.

 अभ्यासक्रमांना भावी रोजगार बाजारातील कौशल्ये आणि ज्ञानाच्या मागण्यांशी संरेखित करणे.

जागतिक विद्यापीठांशी सहयोगासाठी विद्यापीठांच्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi