मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी घेण्यात यावी. अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा, जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत. आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजूरीनंतर निधी मिळेल. पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणा-या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिका-यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
No comments:
Post a Comment