Friday, 7 November 2025

जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

  जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये

मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

 

मुंबईदि. 6 : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय)पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

 

नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय)पुणे उदयराज चव्हाणनोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रकपुणे विभागधर्मदेव माईनकरसह जिल्हा निबंधक वर्ग-1पुणे शहर संतोष हिंगाणेसहाय्यक्र नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र.4. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयपुणे श्रीमती अनुजा कुलकर्णीअति. कार्य. सहाय्यक़ नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र. 12नोंदणी महानिरीक्षक कार्यालयपुणे संजय पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.

 

या समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करुन सविस्तर अभिप्रायासह आपला अहवाल 7 दिवसांत सादर करावयाचा आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi