Tuesday, 11 November 2025

आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे

 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे

- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

·         मुंबई उपनगरात २३८ आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण

 

मुंबईदि. 10 : शासनाने सुरू केलेली आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांचा सुलभ लाभ मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र हे नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक व्हावेअशी अपेक्षा माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली          

चेतना महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित आपले सरकार सेवा केंद्र वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियारउपजिल्हाधिकारी सुभाष काकडे तसेच मुंबई उपनगरातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

पालक मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीआज जगभर माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या युगात सायबर धोकेही वाढले आहेत. महाराष्ट्राचा सायबर सुरक्षा सेल सक्षम आहेतरीही प्रत्येक सेवा केंद्राने जबाबदारीने काम करून नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवावी. तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक करावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi