Friday, 31 October 2025

सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना

 मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणालेसहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसायउद्योग स्थापन करावयाचा आहेत्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्व जाणून 'सहकारिता मंत्रालय स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून 'सहकारातून समृद्धीकडेहा मार्ग आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून 'अभिनंदन  सहकारी बँकसहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi