Monday, 13 October 2025

वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

 वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात

मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १३ : वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबरपर्यंत टॅक्सीरिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सीरिक्षा सेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करावीअसे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात वसई - विरार महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.

 

बैठकीस आमदार स्नेहा दुबेएस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरवसई - विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशीअपर परिवहन आयुक्त भरत कळसकर आदी उपस्थित होते .

 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेवसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात शेअर टॅक्सी सेवेला परवानगी आहे. टॅक्सीरिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करू नयेप्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातून महामंडळाने ठाणेकल्याण मार्गावर लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करावी. प्रवाशी संख्या लक्षात घेता शहर बस वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. महापालिका क्षेत्रात असलेल्या महामंडळाच्या जागांचा पार्किंग जागांसाठी उपयोग करावायासाठी जागा लागल्यास महानगरपालिकेने जागेचे नियोजन करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

 

वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या विरारवसईनालासोपारा येथे बस डेपो सुरू करावे. नागरिकांना परिवहन सेवा सुलभरित्या मिळावीयाबाबत महानगरपालिकेने कार्यपद्धती ठरवून अंमलबजावणी करावीअसे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi