Thursday, 30 October 2025

१६१ शासकीय इमारतींवर सौर पॅनेल्स

 १६१ शासकीय इमारतींवर सौर पॅनेल्स

-          मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

     सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करावे. हा प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी. राज्याचे अपारंपारिक ऊर्जा धोरण अंतर्गत इमारतीचे छत व जमिनीवरील सौर ऊर्जासंच पारेषण विरहित या योजनेसाठी ५२ हजार कि.वॅ. प्रतिवर्ष क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ४० हजार रुपयांपेक्षा जास्त वीज बिल असलेल्या १६१ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय इमारतींमध्ये सौर पॅनेल्स बसविण्यात येणार असून हायब्रिड मॉडेलद्वारे अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रीन एनर्जी वापरणारा अग्रगण्य विभाग ठरणार असूनमहाराष्ट्र राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलणार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi