Thursday, 2 October 2025

मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

  मंत्रालयातील सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत

पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक

 - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. १ : राज्य शासनाच्या मंत्रालयीन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सल्लागार नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनात शिस्तबद्धता राखण्यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यातअसे निर्देश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध कार्यक्रमधोरणेशासन निर्णय आणि बळकटीकरण आदी विषयांवरील पुनर्विलोकन बैठकीत मंत्री ॲड. शेलार यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियामहाआयटीचे संचालक संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीमंत्रालयात विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले सल्लागार  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत एम्पॅनेल्ड एजन्सीजद्वारे नियुक्त केलेले असले तरी त्यांच्या कामांचा तपशीलमानधन वा इतर माहिती महाआयटीकडे सादर केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व नियुक्तींची माहिती अनिवार्यपणे महाआयटीकडे पाठविणे बंधनकारक करावीयासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात यावी.

राज्यातील विविध विभागांमध्ये सध्या सहा एम्पॅनेल्ड एजन्सीजमार्फत २४६ व्यक्ती सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या प्रक्रियेमध्ये काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त मानधन व प्रशासकीय खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सल्लागार संस्थेच्या पारदर्शकतेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत. या पोर्टलवर सर्व विभागांनी त्यांच्या सल्लागारांची सविस्तर माहिती सादर करणे अनिवार्य असेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi