पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक कुंभमेळ्याचे नियोजन करताना तीन टप्प्यांवर नियोजन करावे असे यावेळी सूचित केले. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या वतीने २०० नवीन बसेस महामंडळास उपलब्ध व्हाव्यात, या बसेस कुंभमेळ्यानंतर राज्यात उपयोगी पडतील असे यावेळी सांगितले. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ परिसरात देश-परदेशातून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा तसेच इतर ठिकाणी देखील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा निश्चिती करण्याचे सुचित केले.
कुंभमेळा प्राधिकरणाचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. आरोग्य, पर्यटन, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग, जलसंपदा विभाग, विमानतळ प्राधिकरण, रेल्वे ऑथॉरिटी, महानगरपालिका, नाशिक महानगर विकास प्राधिकरण या विभागांसह इतर विभागांचा यावेळी सविस्तर आढावा व कामकाजाची सद्यस्थिती मंत्री समितीतील सदस्यांनी जाणून घेतली
No comments:
Post a Comment