Thursday, 30 October 2025

मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन

 मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी२०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावेयासाठी शहरभर विविध प्रदर्शनेकार्यशाळाचित्रपटकलाक्रीडाआरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत  उपक्रमआणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्रीविविध शहरांचे प्रतिनिधीउद्योगसामाजिक संस्थाविद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहेअशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट विकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच या उपक्रमाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi