Wednesday, 29 October 2025

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी, टीआरटीआयमध्ये पीएचडी, फेलोशिपसाठी दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करावी

 बार्टीसारथीमहाज्योतीअमृतआर्टीटीआरटीआयमध्ये पीएचडी,

फेलोशिपसाठी दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत नियुक्त समितीने तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
  • विद्यार्थ्यांनी लहरी हवामानप्रदूषणविषमुक्त शेती या क्षेत्रातील संशोधनावर भर देण्याचे आवाहन

 

मुंबईदि. २८: राज्यातील बार्टीटीआरटीआयसारथीमहाज्योतीअमृतआर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीशिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

या स्वायस्त संस्थांमध्ये पीएचडी फेलोशिपसाठीची जाहिरात गेल्या अडीच वर्षांपासून प्रसिद्ध झालेली नाही यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समिती कक्षात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलआदिवासी विकास मंत्री अशोक उईकेइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाटउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनासामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलवित्त विभागाच्या सचिव शैला एइतर मागास बहुजन कल्याण विभाग सचिव आप्पासाहेब धुळाजविद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीशिष्यवृत्ती मिळत नसल्याबाबत विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पीएचडीसाठी विषयांची निवड याकरिता मार्गदर्शक तत्वे करण्यात येत आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील दहा दिवसात जाहिरात प्रकाशित केली जाईलअसे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यानपीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे मूल्यमापन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी संनियंत्रण यंत्रणा तयार करण्यात यावीअसे सांगितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे राज्याला कसा फायदा झाला याचा अभ्यासही होणे गरजेचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी बदलते हवामान आणि त्यावर आधारित शेतीप्रदूषणएआयविषमुक्त शेतीअवकाळी पावसातही विकसित होणारे वाण आदी क्षेत्रात संशोधन करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असे संशोधन करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi