Wednesday, 29 October 2025

सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा

 सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून

नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा

-         कुंभमेळा मंत्री तथा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन

 

मुंबईदि.२८ : सिंहस्थ कुंभमेळानिमित्त विविध विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांचा आढावा कुंभमेळा मंत्री तथा नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक होईल असे नियोजन करावेअसे आवाहन श्री. महाजन यांनी यावेळी केले.

यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेउद्योग मंत्री उदय सामंतपर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेक्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेनाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडामजिल्हाधिकारी आयुष प्रसादकुंभमेळा आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंगमहापालिका आयुक्त मनीषा खत्रीनाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलेज शर्मापोलीस विशेष महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळेपोलीस आयुक्त संदीप कर्णिकपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi