Wednesday, 29 October 2025

नाशिक कुंभमेळा रामकुंडावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत

 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रामकुंडावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत त्या कायमस्वरूपी नाशिकच्या जनतेला उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचे यावेळी सूचित केले. तसेच गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर देखील तातडीने कार्यवाही करून नदीपासून ते वेगळे करणे आवश्यक असल्याचे व त्यावर प्राधान्याने कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देशित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi