तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार
- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. २५ :- राज्यभरातील तरुण- तरुणींच्या सक्रिय सहभागातून राज्य शासनाचे सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसमावेशक युवा धोरण निर्मितीसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौशल्य विकास आदी पैलूंचा सर्वस्पर्शी विचार करून युवकांकडून सूचना मागविण्यात याव्यात, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची आढावा बैठक मंत्रालयात झाली. युवकांनी शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक व बौद्धिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहावे यासाठी युवा धोरणात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment