Thursday, 16 October 2025

क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा

  

क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा

-मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

मुंबई दि.16 : जागतिक स्तरावर राष्ट्राची उत्कृष्टता साध्य करण्यासाठीक्रीडा व आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच क्रीडा लोकचळवळ वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खेलो भारत नीति 2025 धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या धर्तीवर राज्य क्रीडा धोरण तयार करण्यात यावेयासाठी समिती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. यामध्ये एक खेळ एक संघटनेचा प्राधान्याने समावेश करावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे क्रीडा धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत आढावा घेण्यासाठी  मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय बनसोडेआमदार विजयसिंह पंडीतआयुक्त शीतल तेलीउपसचिव सुनील पांढरे आणि स्काऊट गाईडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi