Sunday, 19 October 2025

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा

 पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत

समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबईदि. १५ : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजनाकेंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायकवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारआरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडेवैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारीमाहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डेमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईकराज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशीमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेमराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईकमुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विनोद जगदाळे, नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.

मध्य प्रदेश मधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य समन्वयकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पत्रकार यांची समिती स्थापन करावी असे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले कीया समितीने राज्य शासनाच्या आरोग्य योजनाकेंद्राच्या आरोग्य योजना यांचाही अभ्यास करून सविस्तर सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये ‘सीएसआर’चाही विचार करावा. मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कशा प्रकारे कॅशलेस आरोग्य सेवा देता येतील याचा त्यात प्रामुख्याने विचार व्हावाअसेही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi