Monday, 13 October 2025

महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण 2023’

 महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण 2023

 

निर्यात वाढीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण 2023’ अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या धोरणांतर्गत आर्थिक प्रोत्साहनेपायाभूत सुविधा विकाससंस्थात्मक सहाय्यऔद्योगिक क्लस्टरचा विकासआंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभाग आणि लॉजिस्टिक साखळी सुधारणा यांसारखे अनेक लाभ दिले जात आहेत.

 

 "एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमांतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांमधून 72 उत्पादने निवडली असूनसूक्ष्मलघु व मध्यम उद्योजकांना निर्यातीकरिता प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या उत्पादनांची ओळख निर्माण करण्यासाठी विशेष सहाय्य दिले जात आहे. राज्यातील उत्कृष्ट उद्योजकांच्या सन्मानामुळे महाराष्ट्रातील उद्योग जगताला नवे बळ मिळून नवउद्योजकांना प्रेरणा मिळणार आहे. आगामी वर्षाच्या निर्यात पुरस्कारासाठी निर्यातदारांनी अधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन उद्योग विभागाने केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi