Thursday, 16 October 2025

महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग 2’चे

 महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग 2चे

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबईदि. 15 : 1931 ते 1948 या कालखंडातील महात्मा गांधी यांनी केलेला पत्रव्यवहारनवजीवनयंग इंडियातरूण भारतबॉम्बे क्रोनिकलहिंदुस्तान टाईम्सइ. नियतकालिकांमधील लेखांचा समावेश असलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग 2 (खंड 51-98) चे प्रकाशन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिरप्रभादेवी येथे करण्यात आले.

 

महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग 2 मध्ये भारतीय इतिहासाच्या आधुनिक युगातील वंदनीय व्यक्तिमत्त्व महात्मा गांधी यांची स्फूर्तिदायक कहाणीत्यांचा व्यक्तिविकासजीवनात त्यांनी केलेल्या कार्यांचा वृत्तांत त्यांच्या स्वत:च्या लेखनाद्वारे व भाषणांद्वारे सांगितला गेला आहे. हे त्यांचे लेख व त्यांची भाषणे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून प्रसिद्ध झाली आहेतच. याशिवाय सरकारी नोंदपत्रेफाइलीसरकारी अहवाल आणि इंग्रजीगुजराती व हिंदी नियतकालिके यातही आहेत. तसेच त्यांची पत्रे जगभर पसरलेल्या अनेक बड्या व सामान्यश्रीमंत व गरीबप्रत्येक वंशाच्या व धर्माच्या लोकांजवळ होती. अशी अनेक भाषणेपत्रे व लेख एकत्र करूनगांधीजींनी एका विश्वस्तनिधीतर्फे स्थापलेल्या अहमदाबादच्या नवजीवन पब्लिशिंग हाऊस या संस्थेने ते वाङ्मय गुजराती भाषेत प्रसिद्ध केले होते. नंतर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाने हे वाङ्मय इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये प्रसिद्ध केले. तसेच महात्मा गांधींची त्यांच्या लिखाणातून दिसून येणारी विचारप्रणाली जनतेसमोर यावी या हेतूने या वाङ्मयाचे भाषांतर प्रादेशिक भाषांमधून व्हावेअशी सूचना भारत सरकारने राज्य सरकारांच्या विचारार्थ पाठविली. ही सूचना तेव्हाच्या मुंबई सरकारला पसंत पडली. यावर मुंबई सरकारने या वाङ्मयाचे मराठी रूपांतर करण्याचे काम हाती घेतले आणि 18 एप्रिल 1959 रोजी या कामासाठी एका समितीची स्थापना केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi