Sunday, 12 October 2025

हॉटेल ताज लँड्स एंड येथे निर्यात क्षेत्रातील उद्योजकांचा होणार सन्मान ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे’ 13 ऑक्टोबर रोजी वितरण

  

हॉटेल ताज लँड्स एंड येथे निर्यात क्षेत्रातील उद्योजकांचा होणार सन्मान

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे’ 13 ऑक्टोबर रोजी वितरण

 

मुंबईदि. 11 : राज्यातील उद्योजकांनी त्यांच्या अप्रतिम कार्यक्षमतेच्या आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाच्या बळावर जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योगमंत्री उदय सामंतउद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सोमवार13 ऑक्टोबर 2025 रोजी हॉटेल ताज लँड्स एंडमुंबई येथे करण्यात येणार आहे.

 

सन 2022-23आणि 2023-24 या वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 67 उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 46 सुवर्ण पुरस्कार17 रौप्य पुरस्कार आणि चार प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारांची निवड आठ श्रेणींमध्ये करण्यात आली असून त्यात निर्यातदार- मोठे उत्पादक घटकसूक्ष्मलघु व मध्यम उत्पादकव्यापारी निर्यातदारमान्यताप्राप्त निर्यात गृहव्यापार गृहलघु उत्पादक निर्यातदारांसाठी प्रादेशिक पुरस्कारराज्य शासनातील महामंडळे आणि सेवा निर्यातदार यांचा समावेश आहे.महाराष्ट्र निर्यातीमध्ये अग्रगण्य महाराष्ट्राने देशाच्या निर्यातीमध्ये आपले अग्रगण्य स्थान कायम राखले असून2024-25 या आर्थिक वर्षात राज्याची निर्यात ₹5.57 लाख कोटी आहे. ही भारताच्या एकूण निर्यातीच्या सुमारे 15.05 टक्के आहे. राज्यातील पुणेमुंबई उपनगरमुंबई शहरठाणे आणि रायगड हे पाच जिल्हे निर्यातीत आघाडीवर आहेत. या जिल्ह्यांचा राज्याच्या एकूण निर्यातीमध्ये 73 टक्के वाटा आहे.

 

महाराष्ट्रातून प्रामुख्याने अमेरिकायु.ए.ईहाँगकाँगबेल्जियमयुनायटेड किंगडमचीनसौदी अरेबियानेदरलँड्सजर्मनी आणि मेक्सिको या देशांमध्ये रत्ने व आभूषणेअभियांत्रिकी वस्तूइलेक्ट्रॉनिक्स व विद्युत घटकरसायने आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांतील वस्तूंची निर्यात केली जाते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi