मानीव अभिहस्तांतरण दस्तांच्या अभिनिर्णय पूर्व तपासणीसाठी
पुणे सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे विशेष अभियान
मुंबई, दि. २७ : मानीव अभिहस्तांतरण दस्ताच्या अभिनिर्णयाच्या अनुषंगाने सहकारी गृहरचना संस्थांकडील कागदपत्रांची पूर्व तपासणी तसेच कागदपत्रांसंबंधी संस्थांच्या शंका व अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले जात आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे शहर या कार्यालयामार्फत २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आले असून अभिनिर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचा सहकारी गृहरचना संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा कालावधी २७ ते ३० सप्टेंबर २०२५ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० असा असून सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत, पहिला मजला, ५-फायनान्स रोड, फोटोझिंको प्रेसच्या मागे पुणे-४११००१ या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध असेल.
No comments:
Post a Comment