Monday, 29 September 2025

तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार

 तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. २५ :- राज्यभरातील तरुण- तरुणींच्या सक्रिय सहभागातून राज्य शासनाचे सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसमावेशक युवा धोरण निर्मितीसाठी सामाजिकशैक्षणिकसांस्कृतिककौशल्य विकास आदी पैलूंचा सर्वस्पर्शी विचार करून युवकांकडून सूचना मागविण्यात याव्यात, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

             राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची आढावा बैठक मंत्रालयात झाली. युवकांनी शिक्षणरोजगार किंवा सामाजिक व बौद्धिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहावे यासाठी युवा धोरणात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरआयुक्त शीतल तेली-उगलेपद्मश्री कांती शहाआमदार सत्यजीत तांबेप्रविण दटकेआशुतोष काळेडॉ. बाबासाहेब देशमुखराजेश पवारसंतोष दानवेअमित गोरखेअभिजीत पाटीलरोहित पाटील, मॉर्डन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे तसेच विविध राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कार विजेते आणि विविध युवा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीसमाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे धोरण पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रमांचा समावेश करावा. महिला व बालविकास विभागसांस्कृतिक कार्यकौशल्य विकास विभाग आदी विभागांच्या समन्वयातून युवकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर देण्यात यावा.

राज्यातील सर्व तरुणांना धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात यावेत. युवकांचे शारीरिकमानसिक आणि भावनिक आरोग्यमानसिक कल्याणव्यसनाधीनता निर्मूलनशिक्षणरोजगारउपजीविकाकृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर गुन्हेगारी प्रतिबंधडिजिटल तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या बाबी युवा धोरणाचा भाग असाव्यातअसे निर्देशही ॲड. कोकाटे यांनी यावेळी दिले.

*****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi