जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामे गुणवत्तेसह कालमर्यादेत करावी
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- जिल्हा सर्व शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये अग्रेसर ठेवावा
- मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठक
मुंबई दि. २३ :- जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांचा दर्जा, गुणवत्ता राखत ही कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण केली जावीत. विकास कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली, तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल. प्रत्येक योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवून जिल्हा सर्व शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये अग्रेसर ठेवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतीखाली वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्स येथील सेंट्रल हॉल येथे झाली. बैठकीस कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment