बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची गरज
बांबू परिषदेतील चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर
मुंबई, दि.१९ : बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित अभ्यास, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची गरज आहे. शिक्षण, उद्योग, संशोधन यांचा समन्वय साधल्यास बांबू उद्योग क्षेत्र झपाट्याने विकसित होऊन बांबू उद्योगातून रोजगार व पर्यावरण विकासाची संधी निर्माण होईल, असे मत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित बांबू परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बांबू लागवडीवर किमान चार वर्षांचे प्रयोग, योग्य जातींची निवड व विविध डायमीटरनुसार वापर ठरवणे महात्त्वाचे असून उत्पादनासाठी लहान-लहान केंद्रे स्थापन करण्याची आवश्यकता आहे. बांबूविषयक काम हे केवळ थिअरीवर न राहता प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित असले पाहिजे. बांबूच्या माध्यमातून आरोग्य, ऊर्जा, स्ट्रक्चर, शेती व उत्पादने अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये उपयोग होऊ शकतो.
No comments:
Post a Comment