Monday, 22 September 2025

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल 'पॉड टॅक्सी' ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी

 परिवहन सेवेचे पुढचे पाऊल 'पॉड टॅक्सी'

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 22 : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटीदेणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल 'पॉड टॅक्सीअसून ही सेवालास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी नागरिकांच्या सेवेत आणावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठकीत दिले.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेकुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशनमुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi