Monday, 22 September 2025

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर

 वृत्त क्र. 3820

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर

- उपमुख्यमंत्री अजित पवार

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. 22 :- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवताकौशल्याधारित शिक्षणसमस्यांचे निराकरणटीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षणज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील 111 गुणवंत शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराज्यमंत्री डॉ.पंकज भोयरआमदार ज.मो.अभ्यंकरज्ञानेश्वर म्हात्रेमनीषा कायंदेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi