Friday, 12 September 2025

राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा

 राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         एक लाख आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

·         विविध क्षेत्रातील गुंतवणुकीतून 47 हजार थेट रोजगार निर्मिती

 

मुंबईदि. 11 : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यशासन नेहमीच प्रयत्नशील असून उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी उद्योगमाहिती तंत्रज्ञानअन्नप्रक्रिया उद्योगगोदामेडेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी ₹1,08,599 कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे सत्तेचाळीस हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमारउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगनमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारीविविध उद्योग समूहांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी एमजीएसए रिअ‍ॅलिटी अध्यक्ष अमरप्रकाश अग्रवालइंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्कउभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढारिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक केतन मोदीअदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलीप्लेक्स कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्य अधिकारी प्रणय कोठारी यांच्यासमवेत राज्य शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांनी सामंजस्य करारांचे आदान प्रदान केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi