केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे. देशामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. जग विकसित आणि विकसनशील अशा दोन भागात विभागले आहे. विकसित देश त्यांच्या अस्तित्वासाठी आणि विकसनशील देश कर्जाने ग्रासले आहेत. मात्र भारत कल्याणकारी योजना, वित्तीय सुधारणा आणि खंबीर नेतृत्वामुळे विकासाची गाथा पुढे नेत आहे.
मागील दहा वर्षात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे ४४ लाख कोटी रुपयांचे विविध योजनांच्या लाभाचे वितरण थेट बँक खात्यात करण्यात येत आहे. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येकापर्यंत बँक जोडण्यात आली आहे. बँकांवरील कर्जाचा भार कमी करून एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) २.५ टक्के ठेवण्यात यश आले आहे. बँकिंग तंत्रज्ञान सुधारण्यासाठी चार 'आर' वर काम करण्यात आले आहे. यामध्य रिकनाईझ, रिकव्हर, रिकॅपॅबिलिटीज आणि रिफॉर्म यांचा समावेश आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment