Sunday, 28 September 2025

रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात रेड अलर्ट; तर आठ जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

 रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात  रेड अलर्ट;

तर आठ जिल्ह्यांसह साताराकोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

 

मुंबईदि. २७:- रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघरठाणेमुंबई शहरमुंबई उपनगररत्नागिरीसिंधुदुर्गनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह  सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्व सूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi