Saturday, 20 September 2025

अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झीरो टॉलरन्स महत्वाचे

 कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झीरो टॉलरन्स महत्वाचे

 

            मुंबई, दि. २० – कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्ये हे पोलीस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झीरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले आहे. तसेच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

            इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त  भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चा सत्राचे पोलीस मुख्यालयकुलाबा येथे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असीम अरूणइंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल आर.एस. माशारीफाउंडेशनचे अध्यक्ष उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओ.पी.सिंहराज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलीस  अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi