Saturday, 27 September 2025

अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेअतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते त्याप्रमाणेच अतिवृष्टीओल्या दुष्काळातही मदत केली जाईल,  असे त्यांनी सांगितले.

 

दारफळ गावात पुरामुळे मोठे  नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि  गावाचा मोठा भाग पाण्यात गेलातसेच ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचेअन्नधान्याचे, शेतीजनावरांचे नुकसान झाले आहे. शेतीघरादारांकरिताअन्नधान्य आदींसाठी शासन मदत करणार असून रस्तेशाळाशेतरस्तेवीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीलाही स्वतंत्र मदत करण्यात येईलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi