Wednesday, 24 September 2025

मराठी चित्रपटांचा गौरव

 मराठी चित्रपटांचा गौरव

शामची आई’: साने गुरुजींच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित ‘शामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा रजत कमळ चा पुरस्कार मिळालाहा  पुरस्कार  चित्रपटाचे निर्माते अमृता अरुण राव व दिग्दर्शक सुजय डहाके यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.

सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला आणि मराठी चित्रपट मंडळ तसेच साहित्य संमेलन प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केलेला हा चित्रपट शाम नावाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्याच्या आईच्या प्रेमत्याग आणि शिक्षणाची भावनिक कहाणी सांगतोचित्रपटात संदीप पाठकगौरी देशपांडेओम भूतकरशर्व गाडगीळसारंग साठ्येमयुर मोरेज्योती चांदेकर आणि सुनील अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेतसाध्या पण प्रभावी कथानकातून प्रेक्षकांना भावनिक प्रवासात गुंतवणारा हा चित्रपट मराठी साहित्याचा सिनेमातील यशस्वी प्रवास दर्शवतोसमीक्षकांनी चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्र आणि अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे.

‘नाळ 2’: 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘नाळ’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नाळ 2’ ने दुहेरी यश मिळवलेआटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी निर्मितसुधाकर रेड्डी यक्कांती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा सुवर्ण कमळ चा पुरस्कार मिळालाहा  पुरस्कारआटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांच्यावतीने   विजयकुमार बन्सल यांनी व चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला

चैत्या नावाच्या मुलाच्या भावनिक प्रवासाचा पुढील टप्पा दाखवणारा हा चित्रपट आपल्या खऱ्या आईला भेटण्यासाठी गावी गेलेल्या चैत्याला आपली बहीण आणि भाऊ असल्याचे कळण्याची कहाणी सांगतो.

याच चित्रपटातील त्रिशा ठोसरश्रीनिवास पोकले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार पुरस्कार मिळालात्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारलावऱ्हाडी बोलीग्रामीण महाराष्ट्राचे नयनरम्य चित्रण आणि आई-मुलाच्या नात्यातील संवेदनशील चित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचा लाडका ठरला. ‘भिंगोरी’ आणि ‘डराव डराव’ ही गाणी विशेष लोकप्रिय झाली.

जिप्सी’: श्याम सूर्यवंशी दिग्दर्शित ‘जिप्सी’ मधील कबीर खंडारे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावलाजो त्याने जो त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारलास्मिता तांबे यांच्यासह प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट एका भटक्या समाजातील मुलाच्या जीवनातील संघर्ष आणि स्वप्नांचा शोध घेतोकबीरच्या सशक्त अभिनयाने चित्रपटाला भावनिक खोली प्राप्त झाली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi