बीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- पुण्यात एम्सच्या स्थापनेसाठी केंद्राशी समन्वय ठेवा
- महत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
मुंबई, दि. 22 :- मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी बीड ते परळी रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर परळी ते थेट अहिल्यानगरपर्यंत प्रवास करता येणार असल्यामुळे या मार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पुणे मेट्रो लाईन-3 शिवाजी नगर ते हिंजवडी या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. प्रकल्पाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सणासुदीचे दिवस असल्याने मेट्रो प्रकल्पांचे काम करीत असताना पुलांखाली वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी. कर्जत-भिमाशंकर-खेड-शिरुर हा नवीन महामार्ग करण्यासंदर्भात त्यांनी आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
No comments:
Post a Comment