Sunday, 28 September 2025

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी अटी लागू

 नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक

वापरास परवानगी

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक

 

मुंबईदि. 27 : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर)अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.

अटी व बंधने

·         परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.

·         उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

·         शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.

·         ध्वनी प्रदूषण नियम२००० मधील नियम ३ व ४ चे पालन करणे आवश्यक राहील.

·         तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा१९८६ अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील.

·         आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi